राजधानीत महाराष्ट्रातील पाच कलाकारांचे ‘युटोपियन’ चित्रप्रदर्शन

नवी दिल्ली (२८ डिसेंबर २०१८) : नागपूर येथील शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाच्या पाच प्राध्यापक व चित्रकारांनी एकत्र येत देशाच्या राजधानीत ‘युटोपियन’ हे अनोखे चित्रप्रदर्शन आयोजित केले आहे.

येथील मंडीहाऊस भागातील रविंद्रभवन कला दालनात दिनांक 27 डिसेंबर 2018 ते 2 जानेवारी 2019 या कालावधीत आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन ललीत कला अकादमीचे सचिव राजन फुलारी यांच्या हस्ते झाले.

प्रदर्शनीत 72 चित्रांचा समावेश

या प्रदर्शनीत पाच चित्रकारांची एकूण 72 चित्र मांडण्यात आली आहेत. यातील तीन चित्रकारांनी अमुर्त चित्रकला प्रकारात तर दोन चित्रकारांनी मानवी आकारांचा वापर करून चित्र सादर केली आहेत. मानवी आकारांच्या माध्यमातून दैनंदिन मानवी जीवनाचे चित्र मांडणारी सुभाष बाभुळकर यांची 30 व अब्दुल गफ्फार यांची 12 अशी एकूण 42 चित्र या ठिकाणी आहेत. निसर्गातील रंग व आकार यांची काव्यत्म पध्दतीने मांडण्यात आलेली अमुर्त चित्रही या चित्र प्रदर्शनीचे खास आकर्षण असून विकास जोशी यांची 10, संजय जठार यांची 12 आणि किशोर इंगळे यांची 8 अशी एकूण 30 चित्र या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहेत. ही सर्व चित्र ॲक्रॅलीक,ऑईल रंगातील आणि ड्राईंग असून प्रदर्शन व विक्रीसाठी मांडण्यात आली आहेत.

दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनाशुल्क खुले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget