मंत्रिमंडळ बैठक (1 जानेवारी 2019) : पर्यटन विकासासाठी शासनाचे प्रायोजकत्व लाभणार

मुंबई ( १ जानेवारी २०१९ ) : राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व राज्य स्तरावर आयोजित अशासकीय कार्यक्रमांना प्रायोजकत्व देण्यासाठी नव्या धोरणाच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी पर्यटन धोरण-2016 ला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार विविध उपाययोजना पर्यटन विभागाकडून राबविल्या जात आहेत. या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होऊ शकत असल्यामुळे या क्षेत्राच्या विकासासाठी खासगी क्षेत्राशी समन्वय साधून प्रयत्न करण्यात येत आहेत. विविध अशासकीय संस्थाकडून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व राज्य स्तरावर आयोजित प्रदर्शने, साहित्य-चित्रपट-नाटक क्षेत्राशी निगडीत संमेलने, चर्चासत्रे, क्रीडा स्पर्धांसह विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांना काही विशिष्ट अटींवर प्रायोजकत्व देण्याचे शासनाच्या विचाराधीन होते, त्यानुसार याबाबतच्या प्रस्तावास आज मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 12 कोटी रूपयांच्या वार्षिक खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget