यवतमाळ येथे 92 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन

पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकराज्य स्टॉलचे उद्घाटन

यवतमाळ (११ जानेवारी २०१९): यवतमाळ येथे आजपासून 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरूवात झाली. यावेळी ग्रंथप्रदर्शनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने लोकराज्य अंकांचा स्टॉल लावण्यात आला. या स्टॉलचे उद्घाटन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्यासह माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक (माहिती) सुरेश वांदिले, अमरावती विभागाचे उपसंचालक राधाकुष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, सहायक संचालक गजानन कोटुरवार,
मंगेश वरकड आदी उपस्थित होते. साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी, ध्वजारोहण, ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन
केल्यानंतर हा कार्यक्रम झाला. लोकराज्य स्टॉलवर लोकराज्यचे विविध विशेषांक यांच्यासह महामानव, महात्मा गांधी आणि महाराष्ट्र, महाराष्ट्र वार्षिकी, मॅग्नेफिशियंट महाराष्ट्र आदीचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह इतर मान्यवरांनी लोकराज्यच्या अंकांची तसेच इतर प्रकाशनांची पाहणी केली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget