मंत्रिमंडळ बैठक ( 8 जानेवारी 2019) : परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र आणि शारीरिक शिक्षण विषयास अनुदान

मुंबई ( ८ जानेवारी २०१९ ): बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र आणि शारीरिक शिक्षण या विषयांना अनुदान देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे परळीसारख्या ग्रामीण भागात तांत्रिक शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या या महत्त्वाच्या संस्थेस बळकटी मिळणार आहे.

महाविद्यालयातील दोन्ही विषयांच्या ऑक्टोबर 2010 च्या विद्यार्थी संख्येच्या आधारावर ही मान्यता देण्यात आली आहे. विद्यार्थी संख्येच्या निकषानुसार महाविद्यालयातील संगणकशास्त्र विषयासाठी तीन पूर्णकालीन प्राध्यापक आणि शारीरिक शिक्षण विषयासाठी एक अध्यापक पद हे अनुदानास पात्र ठरले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या 4 एप्रिल 2012 च्या शासन निर्णयानुसार ही मान्यता देण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget