मंत्रिमंडळ बैठक (1 जानेवारी 2019): कल्याण डोंबिवली महानगरपालिका नव्याने समाविष्ट 27 गावांमधील एलबीटी थकबाकीसाठी अभय योजना

मुंबई ( १ जानेवारी २०१९ ) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांमधील स्थानिक संस्था कराची थकबाकी वसूल करताना अभय योजना लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

राज्यातील स्थानिक संस्था कर लागू असलेल्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये थकबाकी वसूली करताना, 3 जून 2015 ते 31 ऑगस्ट 2015 या कालावधीमध्ये स्थानिक संस्था कराचा भरणा केल्यास व्याज आणि दंड माफीची
अभय योजना राज्य शासनाने लागू केली होती. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात जून- 2015 मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 27 गावांमधील व्यापाऱ्यांना या योजनेचा लाभ घेणे त्यावेळी शक्य झाले नाही. या कारणाने, आता या 27 गावांमधील स्थानिक संस्था कराची थकबाकी वसूल करण्यासाठी, मूळ स्थानिक संस्था कराचा भरणा केल्यास व्याज व दंड माफ करणारी अभय योजना सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेचा कालावधी 3 महिने राहणार आहे. या निर्णयामुळे मूळ स्थानिक संस्था कराचा भरणा सुलभरित्या होण्यासह कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget