मंत्रिमंडळ बैठक (1 जानेवारी 2019): पनवेल महापालिका क्षेत्रातील एलबीटी सूट पूर्वलक्षी प्रभावाने

मुंबई ( १ जानेवारी २०१९ ) : लोखंड व पोलाद यांच्यावर प्रक्रिया न करता त्याचा केवळ व्यापार करणाऱ्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील व्यावसायिकांना स्थानिक संस्था कराची सूट पूर्वलक्षी प्रभावाने 1 जानेवारी 2017 पासून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
पनवेल महानगरपालिका 1 ऑक्टोबर 2016 पासून अस्तित्वात आली आहे. या महानगरपालिका क्षेत्रात 1 जानेवारी 2017 पासून स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्यात आला. पनवेल महानगरपालिकेमध्ये लोखंड, पोलाद व त्यासंबंधित वस्तुंवरील (नोंद क्रमांक 55) स्थानिक संस्था कर आकारताना, महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये, लोखंड व पोलादावर कोणतीही प्रक्रिया न करता त्याचा केवळ व्यापार करणाऱ्यांवरील स्थानिक संस्था कर वगळण्याचा निर्णय राज्य शासनाने 17 मार्च 2017 रोजीच्या अधिसूचनेद्वारे घेतला होता. हा निर्णय आता 1 जानेवारी 2017 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget