नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला - मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई (३ जानेवारी २०१९) : ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या निधनाने एक तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्व आणि नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, न्या. धर्माधिकारी यांनी त्यांचे पिता आणि ज्येष्ठ विचारवंत दादा धर्माधिकारी यांचा वैचारिक आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा समर्थपणे सांभाळला होता. गांधीविचारांची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी त्यांची अखेरपर्यंत धडपड होती. अत्यंत कमी वयात स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेण्यासोबतच न्यायदानाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी दिलेले निकाल दिशादर्शक ठरले आहेत. विविध उपक्रमाच्या माध्यमातून ते दीर्घकाळ सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात सेवारत होते. राज्य सरकारला सुद्धा वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन लाभले. महिला सुरक्षा प्रश्नांवर त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अनेक उपयुक्त सुचना केल्या आणि त्या सरकारने स्वीकारल्या होत्या.


न्या. धर्माधिकारी एक श्रेष्ठ मानवतावादी : राज्यपाल
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक श्रेष्ठ मानवतावादी व सच्चे गांधीवादी व्यक्तित्व गमावले असल्याचे दु:ख राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी व्यक्त केले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत घराण्यात जन्मलेल्या धर्माधिकारी यांच्यावर लहान वयातच महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव पडला. मुंबई उच्च न्यायालयात एक आदरणीय न्यायाधीश म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. आपल्या न्यायालयीन कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय दिले. न्या. धर्माधिकारी एक प्रभावी वक्ते आणि उत्तम लेखक होते. ते ग्रामविकास, श्रमिक प्रतिष्ठा व खादीचे खंदे पुरस्कर्ते होते. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या गांधी जयंतीच्या दिवशी ते राजभवन येथे महात्मा गांधींच्या तत्वज्ञानावर बोलले होते. त्यांच्या चिरंतन स्मृतींना मी अभिवादन करतो तसेच त्यांच्या कुटुंबियांना आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget