मंत्रालयातील महिला व बालविकास विभागात मतदार जागृती कार्यक्रम

मुंबई (१६ जानेवारी २०१९) : मंत्रालयातील महिला व बालविकास विभागात आज मतदार जागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला. प्रत्येकाने राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलवर (NVSP) लॉग इन करुन आपले निवडणूक यादीमध्ये नाव असल्याबाबत खात्री करुन घ्यावी. तसेच प्रत्येक नागरिकाने निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेऊन मतदान करुन लोकनियुक्त सरकार स्थापन करण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन महिला व बाल विकास विभागामार्फत विभागातील सर्वांना करण्यात आले.

आजपासून मतदार जागृती मंचव्दारे सर्व सरकारी कार्यालयात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत.

कार्यक्रमात मतदान विषयक मार्गदर्शन कक्ष अधिकारी र. वा. सरफरे तसेच सोनुसिंग शेलार यांनी केले. कार्यक्रमास विभागाचे सहसचिव ला. रा. गुजर, आस्थापना अधिकारी प्रिया जोशी, अवर सचिव भालवणे, साखरे, तसेच विभागातील सर्व कक्ष अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सहसचिव गुजर हे महिला व बाल विकास विभागासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पहात आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget