कादर खान यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई (१ जानेवारी २०१९) : ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्या निधनाने आपल्या सहज अभिनय आणि संवाद लेखनाने हिंदी चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटविणारा कलाकार हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, कादर खान यांनी अभिनयासोबतच पटकथा आणि संवाद लेखनातही महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीतून घेतलेले अभियांत्रिकीचे शिक्षण, प्राध्यापकी आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीकडे वळलेल्या कादर खान यांचा जीवनानुभव समृद्ध होता. विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी समर्थपणे साकारल्या होत्या. त्यांच्या निधनाने एक अष्टपैलू कलावंत हरपला आहे.

कादर खान यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील अष्टपैलू कलाकार गमावला - विनोद तावडे
हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता, विनोदी कलाकार, पटकथालेखक आणि दिग्दर्शक कादर खान यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील अष्टपैलू कलाकार गमावला आहे, या शब्दात ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांना सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. कादर खान यांनी अनेक सुप्रसिद्ध हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या असून उत्तम दिग्दर्शन आणि पटकथा लेखन केले आहे. त्यांच्या विनोदी भूमिका रसिकांमध्ये अधिक लोकप्रिय ठरल्या. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील नवीन पिढीमध्ये पोकळी निर्माण झाली असून हिंदी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget