महिला बचत गटांना उद्योग जगतात वाव मिळण्‍यासाठी महापालिका प्रयत्‍नशिल – उप महापौर हेमांगी वरळीकर

मुंबई (१५ जानेवारी २०१९): महिलांना उद्योग जगतात वाव मिळावा, यासाठी महापालिका प्रशासन दक्ष आहे. मुंबई शहरासह उपनगरांतही पालिका प्रशासनाने बचत गटाचे जाळे निर्माण करण्‍याचे मोठे काम केले असून महिलांना उद्योग जगतात आणण्‍याचे महत्‍वाचे काम महापालिका प्रशासनाने करत असल्‍याचे प्रतिपादन मुंबईच्‍या उप महापौर हेमांगी वरळीकर यांनी केले.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या वतीने सहाय्यक आयुक्‍त (नियोजन) विभाग आणि सहाय्यक आयुक्‍त ‘ए’ विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने महिला बचत गटांनी उत्‍पादित केलेल्‍या वस्‍तुंचे भव्‍य प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन उप महापौर हेमांगी वरळीकर यांच्‍या हस्‍ते आज (दिनांक १५ जानेवारी, २०१९) काळा घोडा, भुयारी मार्ग, फोर्ट येथे करण्‍यात आले.

याप्रसंगी ‘जी/दक्षिण’ प्रभाग समितीच्‍या अध्‍यक्षा किशोरी पेडणेकर, महिला व बाल कल्‍याण समितीच्‍या अध्‍यक्षा स्मिता गांवकर, स्‍थानिक नगरसेविका सुजाता सानप तसेच नियोजन विभाग व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उप महापौर हेमांगी वरळीकर पुढे बोलताना म्‍हणाल्‍या की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या शहरात देशभरातून उद्योग करण्‍यासाठी नागरिक येत असतात. या उद्योगांवर येथे अनेक लोक आपली उपजीविका भागवित असतात. या शहरात उद्योग धंद्यात महिलाही मागे राहू नयेत म्‍हणून महानगरपालिका प्रशासन बचत गटांचे जाळे निर्माण करुन त्‍यांनाही प्रशिक्षण व उद्योगास चालना देण्‍यासाठी प्रेरित करण्‍यात येत आहे. महिल बचत गटांच्‍या उत्‍पादित वस्‍तुला वाव देण्‍यासाठी असे प्रदर्शन निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. बचत गटांच्‍या उत्‍पादीत वस्‍तू जनतेने अधिकाधिक विकत घ्‍याव्‍यात, असे आवाहन यानमित्ताने उप महापौर वरळीकर यांनी केले. फोर्ट, काळा घोडा येथील भव्‍य प्रदर्शन व विक्री केंद्र दिनांक १७ जानेवारी, २०१९ पर्यंत सुरु असणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget