हज यात्रेकरिता इच्छुक हज यात्रा निवडण्यासाठी लॉटरी (कुरी) सोडत कार्यक्रम संपन्न

मुंबई ( ७ जानेवारी २०१९ ): उत्तरप्रदेश राज्यानंतर महाराष्ट्रातून सर्वाधिक हज यात्रेकरु हज यात्रेसाठी जात असून हजसाठी यात्रेकरु पाठविण्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रंमाकावर आहे. हज यात्रेकरुंच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असून या यात्रेकरुंची यात्रा सुरक्षित व्हावी हाच राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांनी आज सांगितले.
आज सकाळी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसलगत असलेल्या हज हाऊस येथे हज यात्रेकरिता जाणाऱ्यांसाठी लॉटरी (कुरी) सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, महाराष्ट्र राज्य हज समितीचे गफर मगदूम, अधिकारी इम्तियाज काझी आदी यावेळी उपस्थित होते.
तावडे यावेळी म्हणाले, हज 2019 साठी महाराष्ट्रातून एकूण 35 हजार 666 इतक्या अर्जदारांकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राथमिक छाननीनंतर पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या एकूण 35 हजार 666 इतक्या अर्जांची नोंदणी करण्यात आली आहे. हज 2019 करिता महाराष्ट्राला एकूण 11 हजार 907 इतका प्राथमिक कोटा प्राप्त झाला आहे. यापैकी 70 वर्षांहून अधिक वय असलेले (राखीव अ प्रवर्ग) आणि महिला राखीव प्रवर्ग (मेहरम शिवाय जाणाऱ्या स्त्रिया) असे 2 हजार 285 जागा वगळता एकूण 9 हजार 622 हज यात्रेकरुंकरिता लॉटरी काढण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget