आयुष्यमान भारत योजनेची मुंबई महापालिका रूग्‍णालयात सुरूवात

मुंबई (१० जानेवारी २०१९): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आयुष्यमान भारत या योजनेत मुंबई महापालिका रुग्णालयात आज पहिली शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयात करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी रुग्णाची व नातेवाईकांची भेट घेऊन विचारपूस केली.
पंतप्रधानांचे आभार मानत शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत ही जन आरोग्य योजना जाहीर केली असून राज्यात ही योजना 23 सप्टेंबर 2018 पासून लागू झाली आहे. या योजनेतून प्रत्येक कुटुंबाला पाच लाखापर्यंतची शस्त्रक्रिया व उपचार मोफत करण्यात येणार असून त्यात राज्यातील 83. 72 लाख कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. शहरी भागातील 24.80 लाख कुटुंब तर ग्रामीण भागातील 58.9 लाख कुटुंबांना याचा लाभ होणार आहे

ही योजना मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तात्काळ सुरू करण्यात यावी व रुग्णांना लाभ मिळावा यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार हे योजना जाहीर झाल्यापासून पाठपुरावा करीत होते. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात ही योजना लागू करण्यात आली असून आज नाशिक येथील
सिद्धांत हजारे या 17 वर्षीय रुग्णावर आज पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली.

हिप रिप्लेसमेंट ची शस्त्रक्रिया करण्यात आली. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजने मध्ये ही शस्त्रक्रिया या आधी होत नव्हती आता अश्या अनेक गोर गरीब रुग्णांना या योजनेचा लाभ होईल. डॉक्टर एम. एम. देसाई आणि त्यांचे सहकारी यांनी ही शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दुपारी साडेचार वाजता केईएम येथे जाऊन या रुग्णांची विचारपूस केली व
नातेवाईकांशी संवाद साधला सिद्धांची आई वडील या दोघांनीही या योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यावेळी आभार मानले. तसेच आमदार आशिष शेलार यांनी ही शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर एम एम देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हेमंत देशमुख ही उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget