शासकीय रेखाकला परीक्षेचे निकाल 14 जानेवारी रोजी जाहीर होणार

मुंबई (१३ जानेवारी २०१९): महाराष्ट्र राज्यातील कला संचालनालयातर्फे सप्टेंबर 2018 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेचे निकाल सोमवारी 14 जानेवारी रोजी जाहीर होणार आहेत.

माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शासकीय रेखाकला परीक्षा घेण्यात येत असून महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यातून एकूण 1,116 केंद्रामार्फत घेण्यात आल्या होत्या. एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांमध्ये 2018 मध्ये एकूण 6 लाख 71 हजार 256 विद्यार्थ्यांनी नावे नोंदविलेली होती.

एलिमेंटरी परीक्षेत हिंगोली जिल्ह्यातील श्री रत्नेश्वर विद्यालय मधील ओंकार केशव भताने हा विद्यार्थी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तर इंटरमिजिएट परीक्षेत पुण्याच्या हुजूर पागा येथील एच.एच.सी.पी हायस्कूल फॉर गर्ल्स शाळेतील पुर्वा विजयकुमार गवळी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

एलिमेंटरी परीक्षेस 3 लाख 96 हजार 949 विद्यार्थ्यांनी नावे नोंदविली होती, त्यापैकी 3 लाख 71 हजार 614 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षा देण्यास पात्र ठरले होते. 17 हजार 694 विद्यार्थी ए श्रेणीत, 56 हजार 239 विद्यार्थी बी श्रेणीत आणि 2 लाख 67 हजार 960 सी श्रेणीत असे एकूण 3 लाख 41 हजार 893 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. एलिमेंटरी परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 92.02% आहे. इंटरमिजिएट परीक्षेस 2 लाख 74 हजार 307 विद्यार्थ्यांनी नावे नोंदविली होती. त्यापैकी 2 लाख 60 हजार 934 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षा
देण्यास पात्र ठरले होते. 14 हजार 894 विद्यार्थी ए श्रेणीत, 39 हजार 550 विद्यार्थी बी श्रेणीत तर 39 हजार 550 विद्यार्थी सी श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.इंटरमिजिएट परीक्षेस एकूण 2 लाख 30 हजार 175 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यार्थ्यांची पास होण्याची टक्केवारी 88.21% आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget