‘स्वच्छ मुंबई – सुंदर मुंबई’ जनजागृतीसाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम

मुंबई (१५ जानेवारी २०१९): केंद्र शासनाच्या ‘स्‍वच्‍छ भारत अभियानांतर्गत आयोजित करण्यात येणा-या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये गतवर्षी राज्याच्या राजधान्यांच्या गटात मुंबईचे नाव देशात अव्‍वल ठरले होते. यावर्षीही मुंबई शहराचे नाव अव्‍वल येण्‍यासाठी मुंबईकरांनी स्‍वच्‍छ भारत अभियानात अधिकाधिक संख्येने सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

केंद्र शासनाच्या ‘गृहनिर्माण व शहरी व्यवहार’ मंत्रालयातर्फे आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ अंतर्गत भारतामधील सर्व शहरांच्या स्वच्छतेच्या अनुषंगाने दिनांक ४ ते ३१ जानेवारी दरम्यान स्पर्धा आयोजित केली आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण - २०१९’ मधील मुख्य घटक तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने दर्जा अधिक सुधारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा तपशिल पुढीलप्रमाणे -

ज्या जागी कचरा तयार होतो, त्याच जागेवर कच-याचे सुका कचरा, ओला कचरा याप्रमाणे विलगीकरण करणे व त्यावर प्रक्रि‍या करणे; यासाठी महापालिकेने विविधस्तरीय उपाययोजना केल्या आहेत.

या उपाययोजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी व सर्व स्तरावरील अधिकारी अथक प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांची परिणामकारकता वाढावी, याकरीता व्यापक स्तरावर जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे.

जनजागृती मोहिमेंतर्गत बृहन्‍मुंबई क्षेत्रांत विविध ९४ ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षणाची होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत. त्याचबरोबर महापालिका कार्यालये, शाळा तसेच गृहनिर्माण संस्था याठिकाणी ‘पोस्टर्स’ लावण्यात
आली आहेत.

शहर व उपनगरांत अनेक ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षणाची भित्तीचित्रे रंगविण्यात आली आहेत. रेल्वे स्थानके, बस स्टॉप या गर्दीच्‍या ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत. तसेच जनजागृती करीता चित्रपट गृहांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणविषयक लघुपट देखील जनजागृती मोहिमेंतर्गत प्रदर्शित करण्यात येत आहेत.

महापालिकेचे सर्व संबंधीत उप आयुक्त व सहाय्यक आयुक्त पहाटेपासून चौक्या तसेच इतर परिसरास भेट देऊन सर्वांगिण स्वच्छतेबाबत पाहणी करुन नागरिकांना स्‍वच्‍छतेचे महत्‍त्‍व सांगत आहेत.

महापालिकेच्या अधिकाऱयांची व कर्मचाऱयांची ‘गुड मॉर्निंग पथके’ पहाटेपासून कर्तव्यावर उपस्थित राहून उघडय़ावरील प्रातर्विधींना अटकाव करण्यासह स्वच्छता राखण्याचे प्रयत्न करीत आहेत. नागरि‍कांमध्ये
स्वच्छतेचे आणि ओला व सुका कचरा विलगीकरणाचे महत्व बिंबविण्यासाठी नाविन्य पूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या उपक्रमांमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱया, स्वच्छता रथ, सायकल रॅली, पथनाटय़ यांचा समावेश आहे. नाताळच्या निमित्ताने महापालिका कर्मचाऱयांनी सांताक्लॉजच्या वेषात येऊन बच्चे कंपनीचे मनोरंजन
करण्याबरोबरच स्वच्छ सर्वेक्षणाचा संदेशही त्‍या दरम्‍यान पोहचविला आहे.

घरातील पाळीव प्राण्यांना फिरावयास नेणाऱया नागरिकांनी आपल्या पाळीव प्राण्यांची विष्ठा उचलावी, याकरीता दंडात्‍मक कारवाई करून दंड वसुली करण्यात येत आहे. याचा चांगला परिणाम दिसण्यास सुरूवात झाली असून श्वानप्रेमी नागरिक आपल्या श्वानास फिरायला नेताना त्यांची विष्ठा उचलण्याची साधने सोबत ठेऊ लागली आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget