लोहमार्ग पोलीसांसाठी 160 शासकीय निवासस्थानांचे येत्या 1 फेब्रुवारी रोजी हस्तांतरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (१४ जानेवारी २०१९): राज्य शासनामार्फत पोलीसांसाठी घरांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात येत आहे. पोलीसांसाठी चांगल्या दर्जाच्या सदनिका देण्याबरोबरच पोलीसांना स्वतःच्या हक्काची घरे मिळावीत यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. या माध्यमातून नजिकच्या काळात सर्वच पोलीसांना स्वमालकीची घरे मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. लोहमार्ग पोलीसांसाठी 160 शासकीय निवासस्थाने येत्या 1 फेब्रुवारी रोजी हस्तांतरीत करण्याची घोषणाही त्यांनी केली.

घाटकोपर येथील पोलीस परेड मैदानावर लोहमार्ग पोलीसांमार्फत आयोजित मुंबई वार्षिक मेळावा २०१९ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, खासदार किरीट सोमय्या, आमदार आशिष शेलार, आमदार राम कदम, लोहमार्ग पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पोलीस मुख्यालयाचा स्मार्ट सिटी योजनेतून विकास करण्यात येईल. शहराच्या रक्षणासाठी पोलीस अहोरात्र मेहनत करतात. लोहमार्ग पोलीसांना तर नेहमीच तत्पर रहावे लागते. दिवस रात्र मेहनत करणाऱ्या लोहमार्ग पोलीसांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित केलेल्या मुंबई वार्षिक मेळावा कार्यक्रमाबद्दल त्यांनी आयुक्तालयाचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मकरसंक्रांती निमित्त सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कलाकारांमार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget