मुंबई शहर जिल्ह्यात इव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहीम

मुंबई (५ जानेवारी २०१८): इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) व व्हीव्हीपॅट यंत्रांविषयी जनजागृती मोहीम मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ नेहरु तारांगण येथे करण्यात आला, अशी माहिती जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी उपयोगात आणावयाच्या इव्हीएम व व्हीव्हीपॅटचा सर्वंकष प्रसार, प्रसिद्धी व जनजागृती मोहीम हाती घेण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यात दि. 25 जानेवारी 2019 पर्यंत मोहीम राबविण्यात येणार आहे. जनजागृतीचा शुभारंभ वरळी मतदार संघातील नेहरु तारांगण येथे आयोजित ‘हौसिंग सोसायटी शो-2018’ पासून करण्यात आला. जनजागृती मोहीमेअंतर्गत कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी कुलाबा विधानसभा मतदार संघात के. सी. महाविद्यालय (चर्चगेट) येथील जनजागृती कार्यक्रमास भेट देऊन प्रशिक्षण देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सुमारे 225 विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.

महाविद्यालयामधील प्राध्यापक, कर्मचारी वृंद तसेच नवीन मतदारांनी उत्साहाने इव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत माहिती करुन घेतली. त्यानंतर डॉ. पाटील यांनी मलबार हिल विधानसभा मतदार संघअंतर्गत चर्नीरोड येथील शासकीय मुद्रण कार्यालय येथील जनजागृती मोहिमेस भेट दिली. या ठिकाणी मुद्रणालय, उपाहारगृह तसेच जवळपासच्या कार्यालयातील 180 हून अधिक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget