महापरिनिर्वाणदिनी उल्लेखनीय कार्य करणारी चमू "ऑफिसर ऑफ द मंथ"

मुंबई (५ जानेवारी २०१८): दरवर्षी ६ डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून दादरच्या चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांचे मुंबईतील वास्तव हे अधिकाधिक सुविधापूर्ण होण्यासाठी बृहन्मुंबई महापालिका सर्वस्तरीय प्रयत्न करीत असते. गेल्याच महिन्यात झालेल्या महापरिनिर्वाणदिनी महापालिकेच्या जी उत्तर विभागाने अविश्रांत मेहनत घेऊन विविध नागरी सेवा सुविधा सक्षमपणे उपलब्ध करुन दिल्या. तर महापालिकेच्या जनसंपर्क खात्याने अत्यंत माहितीपूर्ण दालनांची उभारणी करण्यासह ''महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब नवभारताचे निर्माते'' असे शीर्षक असणारी प्रभावी माहिती पुस्तिका तयार केली त्याचबरोबर तयार पुस्तिकेच्या तब्बल एक लाख प्रतींचे प्रभावी वितरण देखील केले.
या सर्व बाबी लक्षात घेऊन जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार, उपजनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे, जी उत्तर विभागात कार्यरत असणारे दोन दुय्यम अभियंता संदीप कदम आणि सुमंत जाधव यांचा जानेवारी २०१९ करीता महिन्याचे मानकरी अर्थात ''ऑफिसर ऑफ द मंथ'' या बहुमानाने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते प्रतिनिधिक गौरव करण्यात आला आहे. महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पालिका अधिकाऱ्यांच्या मासिक बैठकी दरम्यान महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिनी वैशिष्ट्यपूर्ण आणि नियोजनब्द कार्य करणाऱ्या चमूचा गौरव करण्यात आला. या गौरव समारंभ प्रसंगी अतिरिक्त आयुक्त ( पश्चिम उपनगरे ) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल (पूर्व उपनगरे), अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्हाड (शहर), उपायुक्त रमेश पवार यांच्यासह महापालिकेचे संबधित उपायुक्त सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget