कोलंबिया विद्यापीठाच्‍या शिष्‍टमंडळाने घेतली आदित्‍य ठाकरे व उप महापौरांची सदिच्‍छा भेट

मुंबई (११ जानेवारी २०१९): अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्‍या पंधरा विद्यार्थ्‍यांच्‍या शिष्‍टमंडळाने प्रा.इब्राहिम ओढे यांच्‍या नेतृत्‍वाखाली ‘ ग्‍लोबल लिडर इन कन्‍स्‍ट्रक्‍शन मॅनेजमेंट’ या अभ्‍यास दौऱयांतर्गत शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आदित्‍य ठाकरे व मुंबईचे उप महापौर हेमांगी वरळीकर, स्‍थायी समिती अध्‍यक्ष यशवंत जाधव यांची महापौर निवासस्‍थानी काल दिनांक (०९ जानेवारी २०१९ रोजी) सायंकाळी सदिच्‍छा भेट घेऊन महापालिकेकडून नागरिकांना देण्‍यात येणाऱया सोयीसुविधांबाबत माहिती जाणून घेतली .

मुंबईतील विविध कंपन्‍यांच्‍या बांधकाम ठिकाणी या शिष्‍टमंडळाने भेट दिल्‍यानंतर महापालिकेच्‍या महत्‍वाकांक्षी ‘ सागरी किनारा रस्‍ता’ प्रकल्‍पाबाबत शिष्‍टमंडळातील विद्यार्थ्‍यांनी मान्‍यवरांशी सविस्‍तर
चर्चा केली. यानंतर शिक्षण विभागाच्‍या व्‍हर्च्‍युअल क्‍लासरुम (व्‍ही.टी.सी.) तसेच डिजेटल क्‍लासरुम व्‍दारा महापालिका शाळेतील विद्यार्थ्‍यांना देण्‍यात येणाऱया अद्ययावत शिक्षणाविषयी सविस्‍तर माहिती देण्‍यात आली. त्‍याचप्रमाणे महापालिकेच्‍या प्रमुख रुग्‍णालये तसेच सर्वसाधारण रुग्‍णालयामार्फत मुंबईकरांना देण्‍यात येणाऱया विविध दर्जेदार आरोग्‍य सेवांबद्दल विद्यार्थ्‍यांना माहिती देण्‍यात आली.

याप्रसंगी शिष्‍टमंडळाने महापालिका करित असलेल्‍या विविध नागरीपयोगी कामांबद्दल महापालिकेचे कौतुक केले. तसेच कोलंबिया विद्यापीठाला भेट देण्‍याचे निमंत्रण प्रा.इब्राहिम ओढे यांनी मान्‍यवरांना यावेळी दिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget