जनजाती सल्लागार समितीची पूर्व चर्चा बैठक संपन्न

मुंबई (१६ जानेवारी २०१९): जन जाती सल्लागार परिषदेची पूर्व चर्चा बैठक आज आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मुंबईतील सागर निवासस्थानी झाली. बैठकीस जनजाती कल्याण समिती अध्यक्ष आमदार अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, डी. एस. अहिरे, जे. पी. गावीत, वैभव पिचड यांच्यासह आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा उपस्थित होत्या.

मंत्री सवरा म्हणाले, आदिवासी विकास विभागाशी संबंधित 13 विषयावर आज झालेल्या पूर्व चर्चेच्या अनुषंगाने अभिप्राय द्यावेत, उपयुक्त सूचना कराव्यात. काल मंत्रीमंडळाने घेतलेल्या खावटी कर्ज माफीची सविस्तर माहितीही त्यांनी दिली. हा निर्णय होण्यासाठी सवरा यांनी दिलेल्या योगदानाबद्दल उपस्थित सर्व आमदारांनी यावेळी सवरा यांचे अभिनंदन केले.

विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी आदिवासी विभागासाठी राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण योजना, वन हक्क कायद्याची अंमलबजावणी व याबाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम असल्याची माहिती दिली. तसेच आदिवासींशी संबंधित पेसा, शिक्षण, रिक्त पदे, कौशल्य विकास, जात पडताळणी (ट्राय व सर्वोच्च न्यायालयाचा आदेश), आदिवासी मालकीच्या शेत जमिनी बिगर आदिवासींना विकणे, आदिवासी विकास महामंडळ, संपर्क यंत्रणा याबाबतीत आजच्या पूर्वचर्चा बैठकीत सादरीकरणासह विस्ताराने माहिती दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget