ओपन माइक मध्ये पुन्हा रंगणार गझल, शायरी आणि कविता

ओपन माइक
मुंबई : अस्मिता थिएटर्स तर्फे ओपन माइक या गझल - शायरी कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच अंधेरी येथे करण्यात आले होते. आता पुन्हा २६ जानेवारी २०१९ रोजी ओपन माइक चा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमात कोणीही सहभागी होऊ शकतो. स्वतः च्या गझल, शायरी सोबत कविता सादर करण्याची संधी ओपन माइक मध्ये मिळते, ही या कार्यक्रमाची खासियत आहे.

अरविंद गौर
सुप्रसिद्ध दिग्दर्शक अरविंद गौर यांचे अस्मिता थिएटर्स असून हे दिल्ली मध्ये गेले कित्येक वर्ष सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी अस्मिता थिएटर्स मुंबईत दाखल झाले आहे. हिंदी चित्रपट आणि मालिकांमधील अनेक कलाकार हे अस्मिता थिएटर्स मधून घडलेले आहेत.

मुंबईत दाखल झालेल्या अस्मिता थिएटर्सने गझलकार, शायर आणि कवींसाठी ओपन माइक हा एक प्लाटफॉर्म तयार केला आहे. येथे नवोदितांनी ही स्वतःच्या रचलेल्या रचना सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
आदेश के. अर्जुन आणि पंकज नारायण

नुकत्याच रंगलेल्या शोरो शायरी च्या ओपन माइक चे प्रमुख पाहुणे पंकज नारायण आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिध्द लेखक आणि सवांदकार आदेश के. अर्जुन प्रसिध्द शायर इरफ़ान तरीके खान आणि अश्वनी अवि यांची ही उपस्थिती ओपन माइक मध्ये होती. त्यांनी ही स्वःताच्या रचना यावेळी सादर केल्या. सोबत ४२ जणांनी या ओपन माइक मध्ये आपल्या गझल, शायरी आणि सोबत कविता ही सादर केल्या. मुंबई महापालिकेचे माजी संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. शांताराम नाईक यांनी उपस्थित राहत ओपन माइक कार्यक्रमाला शुभ आशिर्वाद दिले. अस्मिता थिएटर्स चे राहुल दत्ता आणि शमीम राईन यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या ओपन माइक चे व्यवस्थापन प्रदीप कुमार यांनी सांभाळले तर कार्यक्रमाचे निवेदन इमरान कबीरने पार पाडले.

आता २६ जानेवारी २०१९ रोजी पुन्हा ओपन माइक चा कार्यक्रम रंगणार आहे. ओपन माइक मध्ये स्वतःच्या गझल, शायरी सादर करायच्या असल्यास आपण ९९२०७०५६९१ वर संपर्क करू शकता.

शमीम राईन
ओपन माइक
इमरान कबीरΕτικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget