महापालिकेच्या जी नॉर्थ विभागातर्फे "स्वच्छता दौड"


मुंबई (10 जानेवारी 2019): दादर शिवाजी पार्क येथे महापालिकेच्या जी नॉर्थ विभागातर्फे गुरुवारी स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी स्वच्छता दौड चे आयोजन सिनेकलावतांच्या उपस्थितीत करण्यात आले.

शिवाजी पार्क मैदानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ स्वच्छतेचे बलून उडवून स्वच्छता दौड ला सुरुवात झाली. स्वच्छता दौड मध्ये सिनेकलावंत निनाताई कुलकर्णी, भाऊ कदम, प्राजक्ता कुलकर्णी, नेहा जोशी, अरुण कदम आणि दिग्दर्शक अमोल गुळे सहभागी झाले होते. जी नॉर्थ चे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार आणि सहाय्यक अभियंता रंजन बागवे यांच्यासोबत जी नॉर्थ विभागातील 19 खात्यांमधील विभाग प्रमुख, १५० स्टाफ आणि 350 सफाई कर्मचारी ही सहभागी झाले होते. वारा फाउंडेशन च्या अध्यक्षा वृषाली जर्‍हाड आणि दादर वूमन्स नेटवर्कच्या ५० महिला देखील या दौड मध्ये धावल्या.

'सफाई कर्मचारी नसता तर आम्ही नसू, त्यांच्या सेवेमुळेच मुंबई स्वच्छ होते. त्यामुळे तेच खरे नायक आहेत', असे भाऊ कदम यांनी म्हटले.

जी नॉर्थ कर्मचाऱ्यांचे कौतुक करत ही स्वच्छता दौड प्रत्येक वार्ड मध्ये सुरू करायला हवी जेणेकरून नागरिकांमध्ये जनजागृती होऊन स्वच्छतेसाठी मदत होईल, असे नीना कुलकर्णी यांनी यावेळी म्हटले.

स्वछता दौड ची संकल्पना जी नॉर्थ चे वार्ड ऑफिसर अशोक खैरनार यांची असून वर्षभरात जी नॉर्थ वार्ड कचरा शून्य करू, असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दीड किलोमीटर ची स्वछता दौड सुरुवात शिवाजी पार्क मधील समर्थ व्यायाम शाळा येथून झाली. पुढे नाना नानी पार्क ते राजा बडे चौक वरून एस व्ही रोड वरून पुन्हा गणेश मंदिर येथे दौड चा समारोप झाला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन जी नॉर्थ चे अधिकारी तानाजी घाग यांनी केले तर संगम प्रतिष्ठान यांनी स्वच्छता दौड यशस्वी करण्यासाठी हातभार लावला.


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget