सोलापूर – तुळजापूर - उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्ग निर्मितीस मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले केंद्र सरकारचे आभार

मुंबई ( ९ जानेवारी २०१९ ): सोलापूर आणि उस्मानाबाद या शहरांना तुळजापूरमार्गे जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाची निर्मिती करण्यास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या आजच्या सोलापूर दौऱ्यात याबाबत घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीस प्रतिसाद देत केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ८४.४४ किलोमीटर लांबीच्या या नव्या रेल्वे मार्गाच्या निर्मितीस तात्काळ मान्यता दिली आहे. आकांक्षीत उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासाला चालना देणाऱ्या आणि तुळजापूर तिर्थक्षेत्राला रेल्वे मार्गावर आणणाऱ्या या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी तात्काळ निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत.हा रेल्वे मार्ग तुळजापूर येथून जाणार असून त्यामुळे राज्यातील एक प्रमुख तिर्थक्षेत्र रेल्वेमार्गावर येणार आहे. तुळजापूर भागातील नागरीकांची मागील कित्येक वर्षांची रेल्वे मार्गाची मागणी याद्वारे पूर्ण होणार आहे. उस्मानाबाद या आकांक्षीत जिल्ह्याच्या विकासालाही या नव्या रेल्वे मार्गाच्या निर्मितीमुळे मोठी चालना मिळणार आहे.
सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गासाठी सुमारे ९०४.९२ कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. यासाठी राज्य आणि केंद्र शासन 50:50 या प्रमाणात खर्चाचा भार उचलणार आहेत. सिव्हील इंजिनिअरींगच्या
कामासाठी ७२३.९८ कोटी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या कामासाठी ८२.९६ कोटी रुपये, एस अँड टीसाठी 84.55 कोटी रुपये, मेकॅनिकल कामासाठी 4.46 कोटी रुपये, सुरक्षाविषयक कामांसाठी 2.28 कोटी रुपये तर पर्यावरणविषयक किंमतीसाठी ६.६९ अशा एकुण ९०४.९२ कोटी रुपये किंमतीच्या या नव्या रेल्वे प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget