‘पैठणी’ व ‘मिसळपाव’ ठरत आहे राजधानीतील ‘हुनरहाट’ चे आकर्षण

नवी दिल्ली (१७ जानेवारी २०१९) : मुनिया पैठणी , ब्रोकेड पैठणींसह महाराष्ट्राचे झणझणीत व्यंजन ‘मिसळ पाव’ येथे आयोजित ‘हुनरहाट’चे प्रमुख आकर्षण ठरत आहे. कॅनॉट प्लेस येथील बाबा खडक सिंह मार्गवरील स्टेट एम्पोरिया कॉप्लेक्स भागात केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्यावतीने 12 ते 20 जानेवारी 2019 या कालावधीत ‘हुनरहाट’ या हस्त्‍ाकला व खाद्य पदार्थांचे प्रदर्शन व विक्री भरविण्यात आले आहे. प्रदर्शनीचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आणि केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते झाले.

या ठिकाणी विविध राज्यांतील हस्त कलांचे व व्यंजनांचे 75 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. या प्रदर्शनात स्टॉल क्र. सी-58 हा महाराष्ट्रातील औरंगाबादचे साकेब नैय्यर गिराम यांचा पैठणीचा स्टॉल खास आकर्षण ठरत आहे. याठिकाणी 10 ते 60 हजारांपर्यंतच्या पैठणी साडया आहेत. यात मुख्यत्वे मोर , पोपट आणि कमळ यांच्या काठाची खास विण असलेली मुनिया पैठणी आणि हाताने विनलेली ब्रोकेड पैठणीला खास प्रतिसाद मिळत आहे. महिला व तरुणींसाठी खास पैठणी टॉप व दुप्पटे येथे मांडण्यात आली आहेत. सुती पैठणी, नारळी व चटईचे काठ असलेली पांरपारिक पैठणीही येथे आहे. स्टॉल क्र. एफ-7 हा खास महाराष्ट्रीयन व्यंजनांचा स्टॉलही याठिकाणी खवय्यांचे खास आकर्षण ठरत आहे. मुंबई च्या बोरीवली येथील अतुल मेहता यांच्या महाराष्ट्रीयन व्यंजनांच्या या स्टॉल वर मिसळपाव, वडापाव, पाव भाजी आणि समोसा पाव दिल्लीकर खवय्यांना भुरळ घालत आहेत. हे प्रदर्शन 20 जानेवारी 2019 पर्यंत दररोज सकाळी 11 ते रात्री 9 वाजे पर्यंत सर्वांसाठी नि:शुल्क खुले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget