राजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील 20 एनसीसी कॅडेटसची निवड

नवी दिल्ली ( ७ जानेवारी २०१९ ): या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणा-या पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील 20 एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे.

येथील छावनी परिसरातील डिजी एनसीसी परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एनसीसी कॅडेटसाठी सराव शिबीर आयोजित करण्यात आले आहे. उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडु यांच्या हस्ते आज या शिबीराचे उदघाटन झाले. देशभरातील 17 एनसीसी संचालनालयाचे 2000 कॅडेट्स यात सहभागी झाले आहेत. मानाच्या समजण्यात येणा-या राजपथावरील पथसंचलनात देशभरातील 144 एनसीसी कॅडेटस सहभागी होणार आहेत पैकी महाराष्ट्रातील 20 कॅडेट्सची निवड झाली आहे.

राज्यातील 111 एनसीसी कॅडेट्स 1 जानेवारी पासून या शिबीरात दाखल झाले आहेत. यात 74 मुले तर 37 मुली आहेत. त्यातील 16 कॅडेट्स हे माध्यमिक शाळांचे तर उर्वरीत 95 कॅडेटस हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. यातील 10 मुले आणि 10 मुली अशा एकूण 20 कॅडेटसची प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणा-या पथसंचलनासाठी निवड झाली आहे. 28 जानेवारी ला होणा-या 'पंतप्रधान रॅली'मधे मानवंदना देण्यासाठी 50 एनसीसी कॅडेटसची निवड झाली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान आदी गणमान्य व्यक्तींना मानवंदना देण्यासाठी 9 कॅडेट्सची निवड झाली आहे.
घोडस्वारी व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही महाराष्ट्राचे कॅडेट निवडले जाणार
कर्नल एम.पी.एस. मौर्य
राजपथावरील एनसीसीच्या घोडस्वार पथकातील सहभागासाठी आणि एनसीसी कॅडेटसची गणमान्य व्यक्तींच्या भेटी दरम्यान एनसीसीच्यावतीने सादर होणा-या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कॅडेट्सची निवड प्रक्रिया सुरु असून त्यातही महाराष्ट्राच्या कॅडेटसची मोठया संख्येने निवड होईल, असा विश्वास महाराष्ट्राच्या एनसीसी संघाचे प्रमुख कर्नल एम.पी.एस. मौर्या यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना व्यक्त केला.

महाराष्ट्राला पंतप्रधान बॅनरचा बहुमान मिळणार : कर्नल मौर्य
वर्ष भरातील कामगिरी व राजपथ पथसंचलनासाठीचे शिबार या दरम्यान विविध स्पर्धांच्या आधारावर सर्वोत्तम एनसीसी संचालनालयासाठी दिला जाणारा ‘पंतप्रधान बॅनर’ हा बहुमानाचा निकाल 27 जानेवारी रोजी घोषित होणार आहे. गेल्या 27 वर्षांपैकी 17 वेळा ‘पंतप्रधान बॅनरचा’ बहुमान मिळवणारा महाराष्ट्र यावर्षीही हा बहुमान मिळवणार तसेच बेस्ट कॅडेटसचा पुरस्कारही राज्याच्याच वाटयाला येणार असा विश्वास कर्नल एम.पी.एस. मौर्या यांनी व्यक्त केला .

या शिबीरात दररोज पथसंचलनाचा सराव आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत येथे पार पडलेल्या ड्रिल स्पर्धा, राष्ट्रीय एकात्मता जागृकता कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, राजपथ पथसंचलन निवड स्पर्धा, पंतप्रधान रॅली मानवंदना निवड स्पर्धा आदी स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील कॅडेटस सहभागी झाले असून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget