जागतिक पुस्तक मेळयात ब्रेल लिपीतील मराठी भाषेमधील पुस्तकांचे आकर्षण

नवी दिल्ली ( ९ जानेवारी २०१९ ): जागतिक पुस्तक मेळयात ब्रेल लिपीतील मराठी भाषेमधील पुस्तकांचे दालन आकर्षण ठरत असल्याचे चित्र यंदाच्या पुस्तक मेळ्यात दिसत आहे.
जागतिक पुस्तक मेळ्याचे आयोजन राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनवीटी) च्यावतीने प्रगती मैदान येथे 05 ते 13 जानेवारी 2019 पर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे. यावर्षीच्या पुस्तक मेळयाची मध्यवर्ती संकल्पना ही ‘दिव्यागांसाठी वाचनाची गरज’ यावर आधारित आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून वाचकांपर्यंत दिव्यागंमधील क्षमतेचा परिचय करुन देण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) केल्याचे चित्र जागतिक पुस्तक मेळयात दिसते.
याठिकाणी ब्रेल लिपीतील मराठी भाषेतील पुस्तकांमधे रविंद्र भट लिखित स्वातंत्र्य वीर सावरकर, साने गुरुजी लिखित मुलांसाठी फुले, वर्षा काळे लिखित कुरुक्षेत्रानंतर, सत्यापाल पटाईत लिखित गुरु तेग बहादूर, र्स्वणलता भीशीकर लिखित, युगनाईक भाग-१, भाग-२, जयवंत धोंड लिखित मुंगी उढाली आकाशी, आशा भालेकर लिखित पंचतंत्र, हेलन केलर चरित्र ‘आंधळी,’ मराठी संतचरित्र संत नामदेव, आदि ब्रेल लिपीतील पुस्तके येथे ठेवण्यात आलेले आहेत.
पुस्तक मेळ्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमात ‘लावणी’ आणि ‘स्वरांजली’ शनिवार दिनांक 12 जानेवरीला ‘थीम पॅवेलियन 7-ई’ मधे 11.30 ते 1.00 वाजेपर्यंत मराठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यामध्ये सुजाता नंदेश्वर आणि त्यांच्या समूहातर्फे ‘लावणी’ सादर केली जाईल. त्यानंतर जीवन तळेगांवकर आणि त्यांच्या सहकलाकारा तर्फ ‘स्वरांजली’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे.
‘आपल्या ध्येयाचे उदिष्ट्य कसे साध्य करावे’ याविषयावर रविवार दिनांक 13 जानेवारीला ‘थीम पॅवेलियन 7-ई’ मधे 11.30 ते 1.00 वाजेपर्यंत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार प्राप्त भूषण तोष्णीवाल, नीलकंठ पोमन आणि सुवर्णा राज परिसंवादात सहभाग घेतील.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget