महाराष्ट्रातील माहोल एकदम सुरक्षीत... आय लाईक इट!

पुणे (११ जानेवारी २०१९): खेलो इंडिया स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रात आलोय...महाराष्ट्र शासनाने एकदम चांगली व्यवस्था केली आहे. आम्हाला आतापर्यंत काहीच अडचण आली नसून महाराष्ट्रातील माहोल एकदम सुरक्षीत असल्याचे सांगत “आय लाईक इट” अशी उत्स्फुर्त प्रतिक्रीया अरुणाचल प्रदेशच्या कुस्ती संघाचे प्रशिक्षक दारी लोकम यांनी आज दिली.

खेलो इंडिया युथ गेम्ससाठी महाळुंगे-बालेवाडी येथे कुस्तीचा संघ घेवून आलेले श्री दारी लोकम पुढे म्हणाले, अरूणाचल प्रदेशचा कुस्तीचा संघ पहिल्यांदाच खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी झाला आहे. कुस्तीचे दोन खेळाडू आम्ही स्पर्धेत उतरवले आहेत. येथील खेळाडूंची तयारी बघता आम्हाला पदकाची फारशी अपेक्षा नाही, मात्र आमचे खेळाडू सर्वांची मने नक्कीच जिंकतील. या स्पर्धेच्या निमित्ताने चांगला मंच आमच्या खेळाडूंना उपलब्ध झाला आहे.

या ठिकाणचा माहोल एकदम चांगला आहे, खेळाचे वातावरण चांगले आहे. अशा प्रकारची स्पर्धा प्रत्येक वर्षी घेतली तर त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम पुढच्या पिढीसाठी होईल. स्पर्धेचे आयोजन एकदम नेटके आणि सुंदर केले आहे. या ठिकाणी येवून आम्ही आणि आमचे खेळाडू बरेच संचित सोबत नेवू असा विश्वास  लोकम यांनी व्यक्त केला.

हो आता खेळतोय महाराष्ट्र...

“खेळेल महाराष्ट्र तर जिंकेल राष्ट्र” ही थीम घेऊन सुरू असणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेचा ज्वर आता चढायला सुरूवात झाली आहे. खेलो इंडिया स्पर्धा पहाण्यासाठी रोज हजारोंच्या स्ंख्येत येणारे विद्यार्थी या निमित्त उभारण्यात आलेल्या खेलोत्सव एक्स्पोत मित्र-मैत्रीणींसह शिक्षक आणि पालकांच्या सोबत विविध खेळांचा आनंद लुटत आहेत. खेलो इंडियाच्या निमित्ताने “हो आता खेळतोय महाराष्ट्र”... असेच सकारात्मक चित्र दिसत आहे.

युवकांच्यात खेळाची संस्कृती रुजावी आणि खेळाकडे पाहण्याचा शिक्षकांचा आणि पालकांचा दृष्टीकोन बदलावा यासाठी गेल्या दोन वर्षापासून देशपातळीवर खेलो इंडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेच्या माध्यमातून देशाला नवीन ऑलंपिक पदक विजेते गवसतीलच, मात्र नवी क्रीडा संस्कृतीही रूजणार आहे.

खेलो इंडिया स्पर्धा पाहण्यासाठी आलेले विविध शाळांचे विद्यार्थी खेलोत्सवाच्या निमित्ताने मांडण्यात आलेल्या खेळांचा मनमुराद आनंद लुटत आहेत. तिरंदाजी, नेमबाजी, वॉल क्लायंबींगसारख्या जरा वेगळ्या
खेळांची माहिती घेत तेथेही आपले कौशल्य आजमावत आहेत. नेहमी अभ्यासासाठी मागे लागलेले पालक आणि शिक्षकही खेलो इंडियातील वातावरणामुळे आता मुलांना खेळायला प्रोत्साहन देत त्यांच्या सोबत खेळण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.

इथ खुप मज्जा येतेय...

खेळोत्सव एक्स्पोत मैत्रिणींसोबत वेगवेगळ्या खेळांचा अस्वाद घेतल्यावर एकदम खुश झालेली इयत्ता सातवीत शिकणारी राजश्री गायकवाड एकदमच भारावलेली होती. खेलो इंडियाच्या निमित्ताने नवीन खेळ बघायला आणि खेळायला मिळाले असे सांगताना इथ खूप मज्जा येतेय अशी प्रतिक्रीया तीने दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget