(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ बैठक : मुंबई विद्यापीठात प्रा.बाळ आपटे यांच्या नावाने सेंटर फॉर स्टडिज इन स्टूडंटस ॲड युथ मुव्हमेंट | मराठी १ नंबर बातम्या
" />

मंत्रिमंडळ बैठक : मुंबई विद्यापीठात प्रा.बाळ आपटे यांच्या नावाने सेंटर फॉर स्टडिज इन स्टूडंटस ॲड युथ मुव्हमेंट

मुंबई, दि. 20 : मुंबई विद्यापीठांतर्गत प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडिज इन स्टूडंटस ॲड युथ मुव्हमेंटची स्थापना करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. देशात अशाप्रकारचे हे एकमेव केंद्र असणार असून 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित होणार आहे.

सामाजिक परिवर्तनाच्या रचनात्मक आणि आंदोलनात्मक बाबींमध्ये विद्यार्थी व युवक चळवळीचे मोठे योगदान राहिले आहे. या योगदानाचा अभ्यास करण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व करणारे आणि 1960 च्या दशकात विद्यार्थी सामाजिक सहभागाची संकल्पना राबविणारे प्रा.बाळ आपटे यांचे नाव या केंद्राला देण्यात आले आहे. या केंद्रासाठी शासनाकडून 25 कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यास तसेच आवश्यक पदनिर्मिती आणि 58 लाख 78 हजाराच्या आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली. केंद्र कार्यान्वित करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget