(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मिऱ्या समुद्र किनारी धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठीचा प्रस्ताव तत्काळ सादर करा - रवींद्र वायकर | मराठी १ नंबर बातम्या
" />

मिऱ्या समुद्र किनारी धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठीचा प्रस्ताव तत्काळ सादर करा - रवींद्र वायकर

मुंबई ( ८ फेब्रुवारी २०१९ ) : रत्नागिरी जिल्ह्यातील मिऱ्या समुद्र किनारी दरवर्षी होणारी धूप व त्यामुळे तेथील नागरी वस्तीत निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी आधुनिक पद्धतीचा धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले.

रत्नागिरी जिल्ह्यातील धूप प्रतिबंधक प्रकल्प व बांधकामांसदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री. वायकर बोलत होते. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी, रत्नागिरी पत्तन विभागाचे अधिकारी व मिऱ्या समुद्र किनाऱ्यालगतचे ग्रामस्थ उपस्थित होते. वायकर म्हणाले, रत्नागिरी शहरालगतचे मिऱ्या ते पांढरा समुद्र या परिसरातील जवळपास 14 हजार ग्रामस्थांना दरवर्षी पावसाळ्यात समद्राचे उधाण अधिक रौद्र रुप धारण करत असल्याने त्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. या संकटावरती कायमस्वरुपी उपायायोजना करण्याकरिता टेट्रापॉड, रिटेनिंग वॉल, ब्रेकिंग वॉल यासारख्या आधुनिक पद्धतीचा वापर करुन समुद्र धूपप्रतिबंधक बंधारा बांधणे आवश्यक आहे. यासाठी दोनशे ते सव्वा दोनशे कोटीचा खर्च अपेक्षित आहे. याबाबत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा प्रस्ताव तत्काळ सादर करावा.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget