(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंत्रिमंडळ बैठक : रावल सहकारी सूत गिरणीस शासनाचे अर्थसहाय्य | मराठी १ नंबर बातम्या
" />

मंत्रिमंडळ बैठक : रावल सहकारी सूत गिरणीस शासनाचे अर्थसहाय्य

मुंबई, दि. 20 : धुळे जिल्ह्यातील रावलगाव-दोंडाईचा येथील सहकार महर्षी दादासाहेब रावल सहकारी सूत गिरणीची शासकीय अर्थसहाय्यासाठी निवड करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

नवीन वस्त्रोद्योग धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे शिंदखेडा तालुक्यातील कापूस उत्पादक भागातील शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. नवीन धोरणानुसार कापूस उत्पादक जिल्ह्यांमधील सहकारी तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या सूत गिरण्यांना शासनाकडून भागभांडवलाची योजना राबविण्यात येते. ज्या तालुक्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या कापसापैकी 50 टक्क्यांपेक्षा कमी कापूस सूत गिरण्यांसाठी वापरला जातो अशाच तालुक्यात ही योजना राबविण्यात येत आहे. 10: 30: 60 या नवीन आकृतीबंधाप्रमाणे खुल्या प्रवर्गातील या सूत गिरणीस हे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget