(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या वारसांकरिता धनादेश सुपूर्द | मराठी १ नंबर बातम्या
" />

पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या वारसांकरिता धनादेश सुपूर्द

मुंबई, दि. २७ : पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्यात राज्यातील वीरमरण आलेल्या दोन जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीकरिता प्रत्येकी ५० - ५० हजार रूपयांचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सुपूर्त करण्यात आले.

विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या कक्षात नाशिक (पश्चिम) च्या आमदार सीमाताई हिरे यांच्या नियोजनातून हे धनादेश देण्यात आले.

सिडको येथील शिवजन्मोत्सव समितीने शिवजयंती उत्साहात साजरी न करता अत्यंत साधेपणाने जयंती साजरी करत हा निधी वंदना नितीन राठोड आणि सुषमा संजय राजपूत या वीर पत्नींकरिता प्रत्येकी ५०-५० हजार रुपयांचा धनादेश दिला.

याप्रसंगी आमदार सीमाताई हिरे, मुकेश शेवाळे, अंकुश वऱ्हाडे, वैभव देवरे, योगेश गांगुर्डे आदी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget