रेल्वेची 45 एकर जमीन धारावी पुनर्विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 25 : रेल्वे जमीन विकास प्राधिकरण व धारावी पुनर्विकास प्राधिकरणामध्ये करार होऊन या कराराद्वारे रेल्वेची 45 एकर जमीन धारावी पुनर्विकास प्राधिकरणाकडे 99 वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या भाडे तत्वावर हस्तांतरित करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

रेल्वे व कोळसा मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थान येथे काल बैठक संपन्न झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

सदरील अंतरिम झालेल्या जागेवर रेल्वे विभागाच्या कर्मचारी निवासस्थानाचे व कार्यालयाचे आधुनिक पद्धतीचे सुविधायुक्त पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. सदरील जमीन धारावी झोपडपट्टी वस्ती येथे निवास
करणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी वापरण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मुंबईचा चेहरा बदलण्यास मदत होणार असून या भागात आर्थिक संपन्नता येऊन रोजगार निर्माण होणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget