मतदान न केल्यास बँक खात्यामधून पैसे वजा होणार असल्याची बातमी चुकीची

मुंबई ( २२ मार्च २०१९ ) : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान न केल्यास बँक खात्यामधून 350 रुपये वजा होणार असल्याची बातमी पूर्णतः चुकीची असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

सध्या समाज माध्यमांवर ही माहिती व्हायरल झाली असून ती तथ्यहीन आहे. एखाद्या व्यक्तिने मतदान न केल्यास त्याच्या खात्यातून पैसे वजा करण्याची बँकांना ताकीद देण्यात आल्याची माहितीही चुकीची आहे. तसेच बँक खाते
नसलेल्या मतदारांकडून मोबाईल फोनचे रिचार्ज करताना 350 रुपये वसूल केले जाणार असल्याची माहितीही तथ्यहीन आहे. नागरीकांनी अशा बातम्यांवर विश्वास
ठेवू नये, तसेच अशा बातम्या समाज माध्यमांवर फॉरवर्ड करु नये, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

तथापी, मतदान करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य असून मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक नागरीकाने लोकसभा निवडणुकीसाठी अवश्य मतदान करावे, असे आवाहनही या कार्यालयाने केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget