मुंबई उपनगर जिल्ह्यात आचारसंहितेचे पालन ; आतापर्यंत 10 हजार 691 जाहिरात फलक हटविले

मुंबई ( १३ मार्च २०१९ ) : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 साठी दि. 10 मार्च पासून आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुंबई उपनगर जिल्ह्यात आचारसंहितेचे पालन करण्यात येत आहे. आतापर्यंत सार्वजनिक मालमत्तेवरील प्रदर्शित करण्यात आलेल्या जाहिरातींचे 8 हजार 465 फलक, पोस्टर, बॅनर आणि झेंडे काढून टाकण्यात आलेले आहेत. तर, खाजगी मालमत्तेवरील 2 हजार 226 असे एकूण 10 हजार 691 फलक, पोस्टर, बॅनर आणि झेंडे हटविण्यात आले आहेत.

आचारसंहिता तसेच निवडणूक खर्चाचे पर्यवेक्षण करण्यासाठी भरारी पथक, Static Surveillance Team, Video Surveillance Team व Video Viewing Team विधानसभा मतदारसंघ निहाय स्थापित करण्यात आलेल्या आहेत. नवीन मतदार नोंदणीबाबत माहिती आवश्यक असल्यास तसेच आचारसंहितेचा भंग किंवा निवडणूकीच्या खर्चासबंधी तक्रारीबाबत मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी तक्रार कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आलेला आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात दिनांक 29 एप्रिल, 2019 (सोमवार ) रोजी चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून दिनांक 23 मे, 2019 (सोमवार) रोजी मतमोजणी होणार आहे. या जिल्ह्यात 4 लोकसभा मतदार संघ आहेत, त्यात 26 विधानसभा मतदार संघ अंतभूर्त आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक
अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांनी कळविली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget