मुख्य न्यायाधीशांचा शपथविधी रविवारी

मुंबई ( ५ एप्रिल २०१९ ) : मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग रविवारी दि. 7 एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता पदाची शपथ घेणार आहेत.

राज्यपाल चे. विद्यासागर राव न्यायमूर्ती नंदराजोग यांना राजभवन येथील जल विहार सभागृहात पदाची शपथ देतील.

न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग सध्या राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती नरेश पाटील दिनांक ६ एप्रिल रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget