अमिन सयानी यांचे आकाशवाणीसाठी अमुल्य योगदान - राज्यपाल चे. विद्यासागर राव

मुंबई ( १८ एप्रिल २०१९ ) : ज्या काळात मनोरंजनांचे साधन फक्त आकाशवाणी होते. त्यावेळी अमिन सयानी यांनी ‘बिनाका गीतमाला’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठा प्रेक्षक वर्ग आकाशवाणीशी जोडला गेला. अमिन सयानी यांचे हे योगदान आकाशवाणीसाठी अमुल्य असल्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सांगितले.

सी.बी.डी. फाऊंडेशन यांनी अमिन सयानी यांच्यावर आधारित ‘आवाज के दुनियाके दोस्त’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचा शुभारंभ वीर सावरकर सभागृह, दादर येथे राज्यपाल राव यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. सयानी यांनी आपल्या आवाजाच्या माध्यमातून देशात तसेच विदेशातही लोकप्रियता मिळविली. त्यांचे योगदान देश विसरणार नाही, असेही राज्यपाल राव यांनी सांगितले.

यावेळी भारतीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रशांत पाठराबे, सी.बी.डी. फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप चावरे, झी24 तासचे विजय कुवळेकर प्रेक्षक उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget