चौथ्या टप्प्यातील 17 मतदारसंघात 453 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

लोकसभा निवडणूक-2019

मुंबई ( १० एप्रिल २०१९ ) : लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील चौथ्या टप्प्यातील 17 मतदारसंघात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवार दि.9 एप्रिल रोजी 453 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. चौथ्या टप्प्यासाठी 17 मतदारसंघात मतदारसंघनिहाय नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : नंदूरबार मतदारसंघ-14, धुळे-37, दिंडोरी-17, नाशिक-32, पालघर- 21, भिवंडी-22, कल्याण- 36, ठाणे-29, मुंबई उत्तर-22, मुंबई उत्तर-पश्चिम-27, मुंबई उत्तर पूर्व-30 मुंबई उत्तर-मध्य-27, मुंबई दक्षिण-मध्य-30, मुंबई दक्षिण-17, मावळ-33, शिरुर-27 आणि शिर्डी मतदारसंघात 32. चौथ्या टप्प्यात 2 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. चौथ्या टप्प्यातील अर्जांच्या छाननीनंतर अर्ज माघारी घेण्याची मुदत 12 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget