विद्यार्थ्यांना परिपूर्ण पोषक आहार विषयी अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना

मुंबई ( ३१ मे २०१९ ) : आरोग्यपूर्ण जीवनशैलीत आहार हा एक महत्वपूर्ण घटक आहे. संतुलीत आहार आणि सुरक्षित आहाराची उपलब्धता याविषयी जागरुकता विद्यार्थ्यांमध्ये कमी झालेली आहे. त्यामुळे आरोग्याविषयक समस्यांमध्ये वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने शालेय मुलांसाठी पोषक, पौष्टिक, स्वच्छ आणि सुरक्षित अन्न कसे देता येईल या उद्देशाने विशेष कार्यक्रम तयार केला आहे. त्या प्रमाणे मार्गदर्शक सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.

उच्च न्यायालय, दिल्ली येथे रिट पिटीशन क्रमांक 8567/2010 मध्ये दिलेले मार्गदर्शनपर आदेशा नुसार भारतातील सर्व शाळांमधील मुलांना परिपूर्ण आणि पोषक आहार तसेच अन्न सुरक्षितता, स्वच्छता याबाबत अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, दिल्ली यांनी Guidelines for Making Available Wholesome and Nutritious Food to School Childrenअसे तयार केल्या आहेत त्याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शाळा व कॉलेज तसेच मुलांचे पालक यांना School & College Food Project पूर्णत्वास नेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ज्या अन्न पदार्थांमध्ये मेद, मिठ व साखर जास्त प्रमाणात असते अशा अन्न पदार्थांना HFSS (High Fat, Sodium & Sugar) अन्न पदार्थ म्हणतात. जास्त साखर खाल्याने स्थूलपणा, मधुमेह इ. आजार बळावतात. मुलां मुलींचे वजन वाढणे (लठठपणा) व अति मीठ सेवनाने हा आजार बळावतो. HFSS (High Fat, Sodium & Sugar) घटक पदार्थ असलेले अन्न पदार्थांचे बाजारात आकर्षक जाहिरातींद्वारे सहजपणे कमी किंमतीत पॅकिंगमध्ये उपलब्ध होत असल्याने मुलांमुलीमधील खाण्याच्या सवयी बदलत आहेत. त्यामुळे कार्बोदके/प्रथीने व ईतर आवश्यक घटकपदार्थ जे नैसर्गिकरीत्या (फळे/भाजीपाला) व घरी बनविलेले ताजे अन्न पदार्थ मुलांमुलींना मिळत होते त्याचे प्रमाण कमी झालेले आहे.

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे त्याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय, निमशासकीय व खासगी शाळांमध्ये राबविण्यासाठी शासनाने दिनांक 3 मे 2019 रोजी मंजुरी दिलेली आहे.

अभ्यासा बरोबरच मुलांना परिपूर्ण आहार मिळणे आवश्यक असल्याने-
बर्गर, पिझ्झा, चॉकलेट, आईसक्रीम, फ्राईज इ.
थोडक्यात खा
Stringently
खादयतेल, फॅट, मिट, फिश, अंडी इ.
साधारणपणे खा
Moderately
फळे भाज्या
जास्त प्रमाणात खा
Liberally
कडधान्ये, तृणधान्ये, दुध
नियमित पुरेशा प्रमाणात खा
Consume Adequately

असा संदेश दिला जाणार असून त्याप्रमाणे शाळांच्या उपाहारगृहामधून पुरविल्या जाणा-या/विक्री केल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये आवश्यक ते बदल करण्याचा व लहान मुलांमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लठठपणा (Obecity) कमी करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट, वैदयकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग सचिव डॉ. संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम महाराष्ट्र राज्यात राबविला जात आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget