(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); बारावीची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यास 24 जूनपर्यंत मुदतवाढ | मराठी १ नंबर बातम्या
" />

बारावीची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यास 24 जूनपर्यंत मुदतवाढ

मुंबई ( १९ जून २०१९ ) : जुलै -ऑगस्ट २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास 24 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत नियमित, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीनुसार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन बसणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी बारावीची परीक्षा जुलै- ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत.

विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे 15 ते 24 जून या काळात भरता येणार आहे. यानंतर उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयांनी 24 ते 29 जून या काळात बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचे आहे. उच्च माध्यमिक विद्यालय/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्याची तारीख 2 जुलै असणार आहे. बारावी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने नियमित शुल्काने सादर
करण्याची तारीख 3 ते 14 जून 2019 होती. मात्र विद्यार्थी हित लक्षात घेऊन दि. 15 ते 24 जूनपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे विलंब शुल्कानुसार सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget