मुंबई ( २६ जून २०१९ ) : कोकणातील प्रलंबित धरणे व अन्य धरणांच्या कामांबाबत तेथील लोकप्रतिनिधींची आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वंकष असे धोरण ठरविणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी आज विधानपरिषदेत दिली.
वागदे ता.कणकवली जि. सिंधुदूर्ग येथील लघुपाटबंधारे धरण प्रकल्पाच्या प्रलंबित कामाबातची लक्षवेधी सूचना सदस्य प्रसाद लाड यांनी मांडली होती, त्याला उत्तर देताना सावंत बोलत होते.
सावंत म्हणाले, राज्यात अपूर्ण धरणांची कामे पूर्ण करण्याबाबत ठरविलेल्या धोरणानुसार 80 टक्के अपूर्ण धरणाची प्रथम कामे त्यानंतर 50 टक्के अपूर्ण धरणाची कामे असा आकृतीबंद असून त्यानुसारच धरणांची कामे सुरु आहेत. कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असून पाणी आडविण्याचे प्रमाण कमी आहे. त्यासाठी कोकणातील प्रलंबित धरणे व अन्य धरणांच्या कामाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वंकष असे धोरण ठरविले जाईल.
या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई गिरकर यांनी सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा