विधानसभा प्रश्नोत्तरे : कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्प (केम) गैरव्यवहारातील अधिकाऱ्याचे निलंबन - प्रा.राम शिंदे

मुंबई ( १९ जून २०१९ ) : विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा आदी जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्प (केम) यात झालेल्या गैरव्यवहारास जबाबदार असलेले तत्कालीन प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी यांना आज निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा मंत्री प्रा.राम शिंदे आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी केली. यावेळी आमदार सर्वश्री डॉ.संतोष टारफे, अमिन पटेल, अस्लम शेख, राजू तोडसाम, रमेश बुंदीले, निर्मला गावित, ॲड.यशोमती ठाकूर, सीमाताई हिरे यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या वेळी त्यांनी उपरोक्त घोषणा केली.

संबंधित कामामध्ये वित्तीय अनियमितता झाली असल्याने संपूर्ण प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या शासकीय अधिकारी, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेले कंत्राटी व्यक्ती, संस्था व खासगी व्यक्ती यांची पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र यांच्यामार्फत उघड चौकशी सुरु करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत आमदार सर्वश्री बच्चु कडु, विरेंद्र जगताप, सुनिल देशमुख यांनी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget