(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक मंडळाच्या गैरप्रकाराबाबत सचिवाचे निलंबन करणार - प्रा. राम शिंदे | मराठी १ नंबर बातम्या
" />

कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक मंडळाच्या गैरप्रकाराबाबत सचिवाचे निलंबन करणार - प्रा. राम शिंदेविधानसभा प्रश्नोत्तरे

मुंबई, दि. 26 : वाशीम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक मंडळाच्या नेमणुकीनंतर झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्यात येणार असून, संबंधित सचिवास तत्काळ निलंबित करणार अशी माहिती पणन व वस्त्रोद्योग मंत्री प्रा.राम शिंदे यांनी दिली.

आज विधानसभेत वाशीम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक मंडळाच्या नेमणुकीनंतर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्यासंदर्भात सदस्य सुनील केदार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना शिंदे बोलत होते.

शिंदे म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक मंडळ नेमणुकीनंतर झालेल्या गैरप्रकाराची चौकशी सहायक निबंधक यांच्यामार्फत सुरू होती. मात्र, प्रशासक मंडळाचे सचिव यांनी दफ्तर उपलब्ध न केल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तरीही, संबंधित सचिवाचे तातडीने निलंबन करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget