डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक आराखडा ऑगस्ट पर्यंत अंतिम करणार - मुख्यमंत्रीमुंबई( २६ जून २०१९ ) : नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्म शताब्दी स्मारकाचा आराखडा येत्या 15 ऑगस्ट 2019 पर्यंत अंतिम करण्यात यावा असे निर्देश नागपूर महानगर पालिकेला देण्यात आले आहेत, हा आराखडा प्राप्त होताच याला तात्काळ मंजूरी देऊन स्मारकाचे काम सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य प्रकाश गजभिये यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर महानगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्म शताब्दी स्मारकासाठी यशवंत स्टेडीयम जवळील 13.56 एकर शसकीय जमीन विनाट महानगरपलीकेस हस्तांतरित करण्याचा ठराव केला आहे. या जागेवरील स्टार बस डेपोचे स्थलांतर व जागेच्या वापरातील बदलाबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget