माजी सदस्य दिवंगत तुकाराम माताडे यांना विधान परिषदेत श्रद्धांजली

मुंबई, दि. 17 : माजी सदस्य दिवंगत तुकाराम नारायण माताडे यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे, अशा शब्दात सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. आज विधान परिषदेत दिवंगत तुकाराम माताडे यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला होता.

सभापती पुढे म्हणाले, तुकाराम माताडे यांचा जन्म 2 जानेवारी, 1938 रोजी पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण बी.ए.बी.एड. पर्यंत झाले होते. त्यांनी सुरुवातीस काही काळ महात्मा फुले हायस्कुल, नाना पेठ, पुणे व भारत इंग्लिश स्कूल, शिवाजीनगर, पुणे येथे अध्यापनाचे कार्य केले होते. तसेच त्यांनी पुणे माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष; महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे सह कार्यवाह; भारतीय शिक्षण मंडळाचे कार्यावाह; पुणे महानगरपालिका शाळा सुधार समितीचे अध्यक्ष; पुणे येथील शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदस्य; महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक संघाचे सल्लागार; महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेत्तर महासंघाचे अध्यक्ष; मध्यवर्ती कारागृह समितीचे सदस्य तसेच पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले. पुणे जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले.

दिवंगत तुकाराम माताडे सन 1978 मध्ये पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र विधानपरिषदेवर निर्वाचित झाले. मंगळवार, दि. 30 एप्रिल, 2019 रोजी त्यांचे निधन झाले. सभागृह नेते महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी हा शोकप्रस्ताव मांडला. या शोकप्रस्तावावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कामगार राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, डॉ. निलम गोऱ्हे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget