विधानसभा प्रश्नोत्तरे : आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या 7 व्या वेतन आयोगाबाबत दहा दिवसांत निर्णय - आदिवासी विकास मंत्री प्रा.अशोक उईके

मुंबई ( १९ जून २०१९ ) : आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या वेतनाबाबत दहा दिवसांत निर्णय अशी माहिती आदिवासी विकास मंत्री प्रा.अशोक उईके यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत आमदार योगेश घोलप यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी उत्तर देताना उईके म्हणाले, विभागामार्फत उपरोक्त मागण्यांसदर्भात 30 जून पर्यंत निर्णय घेण्यात येईल. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार सर्वश्री एकनाथ खडसे, विजय वडेट्टीवार यांनी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget