(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मंगरुळ चव्हाळातील आश्रम शाळेला 51 लाखांची मदत देणार - एकनाथ शिंदे | मराठी १ नंबर बातम्या
" />

मंगरुळ चव्हाळातील आश्रम शाळेला 51 लाखांची मदत देणार - एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 19 : समृद्धी महामार्गासाठी कुणावरही अन्याय केला जाणार नाही. आदिवासी फासेपारधी सुधार समिती, मंगरुळ चव्हाळा या आश्रम शाळेला 51 लाख रुपयांची मदत देणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली.

आदिवासी फासेपारधी सुधार समिती, मंगरुळ चव्हाळा या आश्रम शाळेसंबंधी सदस्य प्रसाद लाड यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना शिंदे बोलत होते.

यावेळी शिंदे म्हणाले, आदिवासी फासेपारधी सुधार समितीस तीन टप्प्यामध्ये प्रत्येकी रक्कम रुपये 17 लाख याप्रमाणे एकूण रक्कम रुपये 51 लाख हे कच्चे असलेले बांधकाम (वाचनालय), विहीर व 6 वर्ग
खोल्यांचे बांधकाम इत्यादीच्या पुनर्वसनासाठी/स्थनांतरणासाठी देण्याचे ठरले.

शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन बांधलेली आदिवासी आश्रम शाळेची मुख्य इमारत समृद्धी महामार्गाच्या आखणीत येत नाही. त्यामुळे समृद्धी महामार्गाचे बांधकाम करताना त्या मुख्य इमारतीस कोणताही धक्का लावण्यात आलेला नाही. मात्र सदर महामार्गाच्या आखणीत येत असलेले कच्चे बांधकाम (वाचनालय), विहीर व संयुक्त मोजणी पार पाडल्यानंतर लोकसत्ताच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून 6 वर्ग खोल्यांच्या बांधकामाच्या पुनर्वसनासाठी आदिवासी फासेपारधी सुधार
समितीच्या समवेत त्यांच्या संमतीने केलेल्या नोंदणीकृत सामंजस्य करारानुसार शासनाने व महामंडळाने त्यांना पुर्णत: मदत केलेली आहे. या चर्चेत सदस्य सर्वश्री ख्वाजा बेग, जोगेंद्र कवाडे, किरण पावसकर आदिंनी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget