प्लास्टिक बंदी आणि मिठी नदीवरील अतिक्रमण कारवाईचा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घेतला आढावा

मुंबई ( ११ जून २०१९ ) : पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज मंत्रालयात प्लास्टिक बंदी आणि मिठी नदीवरील अतिक्रमण निष्कासित करण्यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, प्रधान सचिव अनिल डिग्गीकर उपस्थित होते.

यावेळी पर्यावरण मंत्री कदम म्हणाले, मुंबई आणि मुंबई परिसरात प्लास्टिक बंदी मोहीम यशस्वी होत असून क्रॉफर्ड मार्केट आणि दादरच्या फुल मार्केटमध्ये काही दुकानदार फुले आणि भाजी देण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा सरार्स वापर करताना दिसतात. महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अशा विक्रेत्यांवर कारवाई सुरु करुन दंड आकारावा. या परिसरात पहाटे चार- पाच वाजता प्लास्टिक घेवून गाड्या येतात. अशा गाड्यांवर कारवाई करुन पोलिसांत तक्रार दाखल करावी. असे प्लास्टिक कोणत्या शहरातून येते, त्या कंपनीचे नाव याची देखील नोंद घ्यावी.

मिठी नदी परिसरात असलेल्या झोपड्यांचे सर्वेक्षण तातडीने पुर्ण करुन त्यांना नोटीसा द्या. त्याचबरोबर अनधिकृत झोपडपट्यांवर कारवाई करण्याच्या सूचना कदम यांनी या बैठकीत दिल्या. या बैठकीला पर्यावरण विभागाचे तसेच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget