(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); शेतकऱ्यांच्या ऊसतोडणी यंत्राचे अनुदान देणार - सुभाष देशमुख | मराठी १ नंबर बातम्या
" />

शेतकऱ्यांच्या ऊसतोडणी यंत्राचे अनुदान देणार - सुभाष देशमुख

मुंबई, दि. 26 : राज्यस्तरीय प्रकल्प मंजूर समितीने मंजूर केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या ऊसतोडणी यंत्राचे अनुदान शासन देणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानपरिषदेत दिली.

नांदेड जिल्ह्यासह राज्यातील काही शेतकऱ्यांना ऊसतोडणी यंत्राचे अनुदान मिळण्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य अमरनाथ राजूरकर यांनी मांडली होती, त्याला उत्तर देताना देशमुख बोलत होते.

देशमुख म्हणाले, केंद्र सरकारमार्फत सहकारी साखर कारखाने, व्यक्ती अथवा त्यांचा समुहगट, शेतकरी अथवा त्यांचा समुहगट व स्वयंसहाय्यतागट त्यांच्यासाठी ऊसतोडणी यंत्र खरेदी अनुदान योजना राबविली जाते. राज्यात आतापर्यत राज्यस्तरीय प्रकल्प समितीने मंजूर केलेल्या शेतकऱ्यांना ऊसतोडणी यंत्राचे अनुदान दिलेले आहे. ऊर्वरित शेतकऱ्यांना प्रकल्प मंजूरी समितीच्या 4 जुलै, 2019 रोजी होणाऱ्या सभेत हा विषय चर्चेसाठी ठेवण्यात येणार असून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

या चर्चेत सदस्य सर्वश्री रामहरी रुपनवर, सतीश चव्हाण, अनिल परब आदींनी सहभाग घेतला होता.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget