(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कृषीसाठी यावर्षी अर्थसंकल्पात भरीव तरतूद पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा वाढता सहभाग - कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे | मराठी १ नंबर बातम्या
" />

कृषीसाठी यावर्षी अर्थसंकल्पात भरीव तरतूद पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा वाढता सहभाग - कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडेमुंबई ( २६ जून २०१९ ) : मागील काही वर्षाच्या तुलनेत या पाच वर्षाच्या काळात कृषीसाठी अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात तरतूद केली असून त्याद्वारे भरपूर कामे झाली आहेत. तसेच पीक विम्यासाठीही शेतकऱ्यांचा सहभाग वाढतो आहे, अशी माहिती कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी आज विधानसभेत दिली.

पीक विमासंदर्भात बोलताना डॉ. बोंडे म्हणाले, 2012 पासून पीक विमामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढत आहे. यावर्षी 91 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला. जवळपास 49 लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ झाला असून 87 टक्के भरपाई मिळाली आहे. गेल्या पाच वर्षात एकूण 15 हजार 148 कोटींची भरपाई दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात कामे झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. कृषी विभागासाठी पूर्वीच्या काळी 3 हजार 108 कोटी पर्यंतची तरतूद होती. परंतु आता ती 8 हजार 524 कोटी रुपयांची करण्यात आली आहे. यातील अनिवार्य खर्च 4 हजार 122 रुपये जरी सोडला तरी 4 हजार कोटी रुपये कार्यक्रमासाठी राखीव आहेत. कृषी विभागाने एक लाख 61 हजार शेततळी निर्माण केली तसेच एक लाख 72 हजार 916 विहिरी बांधल्या. गटशेतीमध्ये 400 गट निर्माण केले. त्यासाठी 200 कोटींची तरतूद केली आहे. जवळपास 54 लाख माती नमूने तपासले तर तीन हजार हरीतगृहे निर्माण केली. याद्वारे कमी शेतीवर जास्त उत्पन्न घेवू शकतात. ही कृषी विभागाची उपलब्धी आहे, असेही त्यांनी सांगितले.

यांत्रिकीकरण ही आज आवश्यक बाब आहे. यातही विभागाने उत्तम कामगिरी केली असून 71 हजार ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. यातील सर्व नोंदी ऑनलाईन होत्या. त्यामुळे त्यासाठी कोणाचीही शिफारस चालली नाही.

विभागामार्फत स्मार्ट व पोखरा प्रकल्प राबविण्यात येत आहेत. स्मार्ट हा पणन संदर्भातील प्रकल्प आहे. पोखरा पायाभूत सविधेसाठी आहे. या प्रकल्पात शेतकरी व शेतमजूर यांचा समावेश असून यात पाच हजार 142 गावे सामील आहेत. शासनाने काजू धोरणासंदर्भात अतिशय मोठे पाऊल उचलले आहे त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात राखून ठेवली असल्याचेही त्यांनी सांगितले. एसटीबीटी संदर्भात तज्ज्ञ लोकांची समिती गठित करुन त्यांची शिफारस केंद्रशासनाकडे पाठविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget