(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); विधानपरिषद लक्षवेधी : अकोला महानगरपालिकेतील कामकाजात प्रशासकीय अनियमितता असल्यास संबंधितांवर कारवाई - योगेश सागर | मराठी १ नंबर बातम्या
" />

विधानपरिषद लक्षवेधी : अकोला महानगरपालिकेतील कामकाजात प्रशासकीय अनियमितता असल्यास संबंधितांवर कारवाई - योगेश सागर

मुंबई ( १९ जून २०१९ ) : अकोला महानगरपालिकेतील कामकाजात प्रशासकीय अनियमितता व गैरप्रकार असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी आज विधानपरिषदेत दिली.

अकोला महानगरपालिकेच्या कामकाजाबाबत सदस्य गोपीकिशन बजोरिया यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सागर बोलत होते.

यावेळी सागर म्हणाले, स्वच्छ भारत अभियान मोहिमेंतर्गत असलेल्या ‘हागणदारी मुक्त गाव’ योजनेमध्ये शहरातील एकूण 1317 लाभार्थ्यांना, वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी प्रत्येकी 6 हजार रुपये प्रमाणे अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आलेला होता. तथापि, या लाभार्थ्यांनी विहित मुदतील बांधकाम सुरु न केल्यामुळे, यापैकी 651 लाभार्थ्यांकडून 39 लाख 6 हजार रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आलेली असून, रक्कम वसूल न झालेल्या 666 लाभार्थ्यांच्या संदर्भात प्रथम तपासणी अहवालाच्या आधारे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी पूर्ण क्षमतेने करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण 67 हजार 210 अर्ज प्राप्त झाले असून यातील घटक क्र. 1 मध्ये प्राप्त एकूण 20313 अर्जांच्या अनुषंगाने महानगरपालिकेने मातानगर येथील सविस्तर प्रकल्प अहवाल क्र. 10 हा 244 घरकुलांसाठी शासनाकडे मान्यतेसाठी सादर केलेला आहे. घटक क्र. 2 मध्ये प्राप्त एकूण 519 अर्जांवर महानगरपालिकेकडून कार्यवाही करण्यात येत नसून, ती बँकामार्फत करण्यात येत आहे. घटक क्र. 3 मध्ये प्राप्त एकूण 21512 अर्जांवर महानगरपालिकेने खासगी विकासकांकडून परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीकरिता प्रस्ताव मागविले आहेत. प्राप्त 5 प्रस्तावांपैकी 4 विकासकांचे एकूण 824 घरकुलांचे प्रस्तावावर नगररचना विभागाने अनुकुलता दर्शविली असून, त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

अकोला महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने पदभरती करता आली नसल्याचे अकोला महापालिका आयुक्त यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या चर्चेत सदस्य सर्वश्री शरद रणपिसे, नरेंद्र दराडे आदी सहभाग घेतला.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget