(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली | मराठी १ नंबर बातम्या
" />

दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई ( ५ जून २०१९ ) : रंगभूमी व चित्रपटांच्या माध्यमातून जवळपास पाच दशके रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे ज्येष्ठ अभिनेते व विनोदवीर दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांच्या निधनाने अभियनाच्या क्षेत्रातील एक अनोखा तारा निखळला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ‘श्री. दिनयार कॉन्ट्रॅक्टर हे सशक्त अभिनेते म्हणून परिचित होते. हिंदी तसेच मुख्यत्वे गुजराती भाषेतील दूरचित्रवाणीवरील विविध मालिका, चित्रपट यांतून आपल्या अभिनयाने खास करुन विनोदी भूमिकांतून त्यांनी प्रेक्षकांना आपलेसे केले होते. त्याहून अधिक रंगभूमीवरचा एक दमदार अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. अनेक नाटकांतील त्यांचा अभिनय गाजला होता. त्यांच्या अगदी छोट्या-छोट्या भूमिकादेखील रसिकांच्या स्मरणात आहेत. अभिनयासोबत लेखक व दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केले होते. जवळपास पाच दशके रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या या ज्येष्ठ कलावंताला यंदा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.’
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget